मराठी विभाग
प्रा. अनुराधा मोरे – सहायक प्राध्यापक – अनुभव १६ वर्षे
- उद्दिष्ट्ये :
- विविध क्षेत्रातील भाषा व्यवहार समजून घेणे.
- विविध क्षेत्रातील भाषा व्यवहाराची कौशल्ये विद्यार्थ्यांत विकसित करणे.
- प्रगत लेखन कौशल्ये विद्यार्थ्यांत विकसित करणे.
- विद्यार्थ्यांत लेखन अभिवृद्धी निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांत वाचन अभिवृद्धी निर्माण करणे.
- मराठी विभाग उपक्रम :
- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा :
दर वर्षी जानेवारी महिन्यातील पहिल्या किंवा दुसऱ्या पंधरवड्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विभागाच्या वतीने साजरा केला जातो. यानिमित्ताने खालील विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.
- निबंध लेखन स्पर्धा
- मराठी स्वाक्षरी स्पर्धा
- घोषवाक्य लेखन स्पर्धा
- कथाकथन स्पर्धा
- नाट्य अभिवाचन स्पर्धा
- क्षेत्र भेट
- पत्रलेखन स्पर्धा
- मराठी भाषा गौरव दिन
दिनांक २७ फेब्रुवारी हा दिवस कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होतो. या दिवसाचे औचित्य साधून मराठी विभागाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन दर वर्षी केले जाते. मराठी साहित्य, संस्कृती आणि मराठी भाषा यात योगदान दिलेल्या मान्यवरांना या प्रसंगी आमंत्रित केले जाते.
- भाषांतर कार्यशाळा
- सर्जनशील लेखन कार्यशाळा
Figure 1 ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त ‘मराठी भाषा संवर्धन’ हा संकल्प घेऊन विभागाच्या विद्यार्थ्यांनी तसा संदेश देणारे टी शर्ट परिधान करत परिसरात जागरुकता निर्माण करताना विद्यार्थी.
Figure 2मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त पोस्टर्स प्रदर्शित करताना विद्यार्थी.
Figure 3 ‘मराठी भाषा संवर्धन’ अशी थीम घेवून अनोख्या पद्धतीने ग्रुप डे साजरा करताना विद्यार्थी.
Figure 4‘मराठी भाषा गौरव दिन प्रसंगी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यांना अभिवादन करताना उपस्थित प्रमुख अतिथी डॉ. के.एल. लोखंडे, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, डॉ. बी.बी.गाडेकर, प्रा. अनुराधा मोरे, प्रा. मेघा खैरनार आणि डॉ. पंकज बावणे
Figure 5‘मराठी भाषा गौरव दिन प्रसंगी प्रमुख अतिथी कवयित्री श्रीमती अलका कुलकर्णी यांचा सत्कार करतानाप्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, विशेष अतिथी . डॉ. उत्तम करमाळकर.
Figure 6 ‘मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी श्रीमती अलका कुलकर्णी.
Figure 7 ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त प्रमुख अतिथी कवियित्री तन्वी अमित यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, विशेष अतिथी श्रीमती गीता गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रसाद कुलकर्णी.
Figure 8 ‘मराठी भाषा गौरव दिन’ प्रसंगी संवाद साधताना कवियित्री तन्वी अमित आणि उपस्थित मान्यवर.
Figure 9 ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भाषा प्रयोगशाळेस भेट देताना विभागाचे विद्यार्थी.
Figure 10 भाषा प्रयोगशाळेस भेट
Figure 11दोन दिवसीय भाषांतर कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी ऑनलाईन माध्यमातून मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
Figure 12 दोन दिवसीय ऑनलाईन भाषांतर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ प्रतिभा बिस्वास.
Figure 13 मराठी विभाग आयोजित तीन दिवसीय ऑनलाईन सर्जनशील लेखन कार्यशाळा.
Figure 14तीन दिवसीय ऑनलाईन सर्जनशील लेखन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ वीणा माळी.
Figure 15 तीन दिवसीय ऑनलाईन सर्जनशील लेखन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री. सचिन चंद्रात्रे आणि श्रीमती तृप्ती तिजारे.
Figure 16 मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ऑनलाईन पद्धतीने आयोजित ‘मुक्त चिंतन’ स्पर्धेत सहभागी मान्यवर आणि विद्यार्थी.